आषाढी वारीवर आधारित छायाचित्र स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

मोफत कार्यशाळा रविवारी
स्पर्धेच्या अनुषंगाने फोटोग्राफीविषयक मोफत कार्यशाळेचे आयोजन सकाळ सोशल फाउंडेशन व पिक्‍सल स्कूल यांच्या वतीने रविवारी (ता. २३) संध्याकाळी ५ ते ६.३० या वेळेत ‘सकाळ’ मुख्य कार्यालय, बुधवार पेठ येथे करण्यात आले आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी https://www.facebook.com/events/८६७९४८६३३५५८३९४/ या लिंकला भेट द्यावी.
कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी व स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी संपर्क - राहुल गरड - ८६०५०१७३६६

पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन व पिक्‍सल स्कूल यांच्या संयुक्त सहकार्याने आषाढी वारीवर आधारित छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हौशी, नवोदित व अनुभवी छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धा खुली असून, विजेत्यांना एकूण २५ हजारांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांशी संबंधित छायाचित्रांचा स्पर्धेत समावेश असेल. छायाचित्रांमध्ये वारकऱ्यांच्या भावमुद्रा, वारीतील प्रसंग, मुक्काम काळातील वातावरण, वारकऱ्यांचे खेळ, रिंगण सोहळा आदींचा समावेश असावा.

वारीतील वेगळेपण टिपण्याचा स्पर्धकांनी प्रयत्न केल्यास छायाचित्र पाठविताना तसा आवर्जून उल्लेख करावा. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे दहा हजार, सात हजार, पाच हजार रुपयांची तीन पारितोषिके व प्रत्येकी एक हजार रुपयांची तीन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील.

या स्पर्धेसाठी पिक्‍सल स्कूल ही संस्था मुख्य प्रायोजक असून, संस्थेचे संचालक जितेश पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. संस्थेत फोटोग्राफीविषयक आधुनिक कौशल्यांवर आधारित कोर्सेस शिकविले जातात.

स्पर्धेचे नियम -
यंदाच्याच (२०१९) वारीत घेतलेली छायाचित्रे असावीत.
स्पर्धकांनी ८x१२ ए फोर आकारातील छायाचित्रे wariphoto@esakal.com या ई-मेल वर पाठवावीत.
प्रत्येक स्पर्धक २५ ते ३० छायाचित्रे पाठवू शकतील.
प्रत्येक छायाचित्रासोबत स्पर्धकांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक, तारीख, छायाचित्र काढलेले ठिकाण व प्रसंगाचे नाव ही माहिती छायाचित्राच्या कोपऱ्यात (मूळ छायाचित्राला बाधा पोचू न देता) वॉटर मार्क करून पाठवावी.
मूळ छायाचित्रांवर कोणतेही संगणकीय कृत्रिम बदल केलेले नसावेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aashadhi Wari Photo Competition Sakal Social Foundation Pixel School