वास्तवतेवर संवेदनशील भाष्य करणारा 'आसरा' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

पुणे - झोपडपट्टीवासीयांचे जीवनमान कसे बदलू शकते, यासाठी केलेला संघर्ष आणि मिळालेले अभूतपूर्व यश या सत्यपरिस्थितीवर आधारित पद्माव्हिजन प्रस्तुत "आसरा' हा हिंदी चित्रपट आज ( ता. 2) पासून संपूर्ण देशात झळकणार आहे. यानिमित्ताने "सकाळ'ने चित्रपट कलाकरांशी संवाद साधला. 

पुणे - झोपडपट्टीवासीयांचे जीवनमान कसे बदलू शकते, यासाठी केलेला संघर्ष आणि मिळालेले अभूतपूर्व यश या सत्यपरिस्थितीवर आधारित पद्माव्हिजन प्रस्तुत "आसरा' हा हिंदी चित्रपट आज ( ता. 2) पासून संपूर्ण देशात झळकणार आहे. यानिमित्ताने "सकाळ'ने चित्रपट कलाकरांशी संवाद साधला. 

"पद्माव्हिजन' या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून सदानंद शेट्टी यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांच्या जगण्यावर हा चित्रपट भाष्य करतो. या वेळी चित्रपटाचे निर्माते आणि मुख्य भूमिका साकारणारे सदानंद शेट्टी म्हणाले, ""समाजकारण करताना राजकीय क्षेत्र समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कसे महत्त्वाचे असतात, त्यासाठी संघर्षाला सामोरे कसे जावे लागले, आईने दिलेले पाठबळ, पत्नीसह संपूर्ण कुटुंबाने समाजकारणासाठी कसे झोकून दिले आणि परिस्थितीने गांजलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या जीवनात हक्काचे घर किती महत्त्वपूर्ण असते याबरोबरच त्यांच्या मानसिकतेत परिवर्तन अशी वास्तववादी कथा "आसरा' या चित्रपटाची आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत रहिवाशांना उत्कृष्ट घरे कशी मिळू शकतात, त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो आणि इच्छाशक्ती असेल तर यश कसे मिळते यासाठी "आसरा' हा वास्तववादी हिंदी चित्रपट समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे.'' 

चित्रपटाचे दिग्दर्शक राज सागर म्हणाले, ""संवेदनशील असा चित्रपटाचा विषय आहे. वास्तवतेवर चित्रपट भाष्य करत असल्यामुळे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन चित्रीत करणे आव्हानात्मक होते. याचमुळे प्रेक्षकांना सत्य परिस्थिती जवळून पाहता येईल.'' 

या चित्रपटात सदानंद कृष्णा शेट्टी, प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी, अशोक समर्थ, रघुबीर यादव, ओंकार दास माणिकपुरी, सुनील पाल आणि किशोरी बाळ यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. पटकथा आणि दिग्दर्शन राज सागर यांचे आहे, तर संवादलेखन विशुद्ध आनंद शर्मा यांनी केले आहे. संगीत दिग्दर्शन अबधेश गोस्वामी यांनी केले असून, रघुवीर यादव, सिद्धार्थ महादेवन, अभिजित कोसंबी व अबधेश गोस्वामी यांनी गाणी गायली आहेत. 

Web Title: aasra hindi movie release today