Abdul Sattar : शाळांमध्ये कृषी विषय शिकविणार; कृषिमंत्री अब्दुल सत्तार

कृषिमंत्री अब्दुल सत्तार : कमी कालावधीच्या पिकासाठी चाचपणी सुरू
Abdul Sattar statement Agriculture will taught in schools short duration crop farmer pune
Abdul Sattar statement Agriculture will taught in schools short duration crop farmer puneesakal

पुणे : ‘‘शेतकऱ्यांची मुले अधिकारी व्हावीत. परंतु, काहीही न झाल्यास किमान चांगला शेतकरी व्हावा, यासाठी शाळांमध्ये कृषी विषय शिकविण्यात येणार आहे,’’ असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. कृषिमंत्री सत्तार आज पुण्यात होते. त्या वेळी ते बोलत होते. सत्तार म्हणाले, ‘‘बदलत्या हवामानामुळे काही नवीन पीक पॅटर्न आणता येईल का? याकडे लक्ष आहे.

कमी कालावधीचे पीक घेता येईल का? याचीही चाचपणी सुरू आहे. पाऊस कमी होणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यातही घट झाल्यास संकटाचा सामना करावा लागेल. तरीदेखील शेतकऱ्यांनी हवालदिल होण्याची गरज नाही.

सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. तसेच ‘पीएम किसान’ व ‘नमो शेतकरी’ योजनेतून चार हजार रुपयांचा हप्ता येत्या आठ दिवसांत जमा होईल. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेला वेगळे स्वरूप दिले आहे. यात आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.’’

‘बियाण्यांची कमतरता भासणार नाही’

खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशकांची अजिबात कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. बियाणे, कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेवर लक्ष द्यावे आणि भरारी पथके स्थापन करून चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करत गैरप्रकारांना आळा घालावा, असे आदेश सत्तार यांनी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिले.

यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सौरभ राव, राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण, ‘स्मार्ट’चे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी,

साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते. प्रधान सचिव डवले म्हणाले, ‘‘केंद्र शासनाचा पीक विविधीकरण हा प्राधान्याचा कार्यक्रम असून, त्यासाठी सर्व जिल्ह्यांनी प्रयत्न करावेत. तृणधान्य आणि सूर्यफूल, मोहरी आदी तेलबियांकडे क्षेत्र वळविले पाहिजे. तुरीच्या लागवडीस चालना द्यायची आहे.’’

पिकांच्या उत्पादकतावाढीसाठी कृषी विभागाने आणि विद्यापीठांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. तसेच कृषी विद्यापीठांनी पिकांचे नवनवीन वाण तयार करून त्यांचा प्रचार प्रसार करावा.

- अब्दुल सत्तार, कृषिमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com