गुहागरमधील विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड मैदान येथे होणार आहे. मराठी रंगभूमीवरील  महत्वाचे नाटककार कथाकार आणि कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

संमेलनाचे उदघाटन कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते होणार आहे, यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, विभागीय संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य तानसेन जगताप, मसापचे कोकण विभाग प्रतिनिधी प्रकाश देशपांडे आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.'' ,अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. 

संमेलनाची वैशिष्टये
- शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी
- सांस्कृतिक कार्यक्रमात गणेशवंदना, मंगळागौर, पालखीनृत्य,कोळीनृत्य, शेतकरीनृत्य, नमन या कोकणी लोककलांचे सादरीकरण
- 'रत्नाकर' या स्मरणिकेचे प्रकशन
- पुल, गदिमा आणि बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'काव्य नव्हे हा अमृतसंचय' हा विशेष कार्यक्रम
- चित्पावनी, सामवेदी, आगरी, संगमेश्वरी, दालदी, मालवणी, कातकरी या बोलीभाषांवर परिसंवाद
- नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांची मुलाखत आणि सत्कार
- कारगील विजय या विषयावर अनुराधा गोरे यांचे व्याख्यान
- स्थानिक कवींचे, निमंत्रितांचे आणि हास्य कवींचे कवी संमेलन
- पाठ्यपुस्तकातील लेखक भेटणार विद्यार्थ्यांना

Web Title: Abiram Bhadkamkar was elected president of the Sahitya sammelan