esakal | ...अन् नवऱ्यानेच दिल्या बायकोला गर्भपाताच्या गोळ्या
sakal

बोलून बातमी शोधा

...अन् नवऱ्यानेच दिल्या बायकोला गर्भपाताच्या गोळ्या

गर्भपात करण्याच्या उद्देशाने पत्नीच्या जेवणात पतीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा प्रकार रहाटणी येथे उघडकीस आला.

...अन् नवऱ्यानेच दिल्या बायकोला गर्भपाताच्या गोळ्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गर्भपात करण्याच्या उद्देशाने पत्नीच्या जेवणात पतीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा प्रकार रहाटणी येथे उघडकीस आला. यासह माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पती शेखर रामदास वाघुले (वय 30, रा. हाय फिल्ड पार्क सोसायटी, अमृतवेल कॉलनी, रहाटणी, मूळ-वारूळवाडी, नारायणगाव), सासरा रामदास वाघुले व आशा वाघुले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विवाहितेने फिर्याद दिली आहे. आरोपींनी विवाहितेचा वेळावेळी मानसिक व शारीरिक छळ करीत माहेराहून पैसे आणण्यासाठी शिवीगाळ व मारहाण केली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, विवाहिता गर्भवती असताना त्यांना माहित न होता त्यांचा गर्भपात करण्याच्या उद्देशाने पतीने त्यांच्या जेवणात गर्भपाताच्या गोळ्या मिक्‍स करीत त्यांच्या मनाविरूद्ध गर्भपात केला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

loading image