गर्भपाताचीही आता लाइफस्टाइल!; नकळतपणे असुरक्षित मार्गांचा अवलंब

गर्भपाताचीही आता लाइफस्टाइल!; नकळतपणे असुरक्षित मार्गांचा अवलंब

पुणे : नवऱ्यासोबत डॉक्‍टरांकडे आली, तेव्हा ती फारच अशक्त जाणवत होती. इतक्‍यात मूल नको व घरच्यांना कळू नये, यासाठी तिने गोळ्या खाल्ल्या होत्या. गोळ्यांमुळे झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे तिची ही हालत झाली होती. तातडीने उपचार सुरू केल्याने ती यातून सावरली. 

बदललेल्या लाइफस्टाइलमुळे नवीन जोडप्यांना आयुष्य 'एन्जॉय' करण्यासाठी काही अवधी हवाहवासा वाटतोय. मात्र त्याचवेळी नकळत गर्भधारणा होत असून, तीही नकोशी वाटतेय. अशा परिस्थितीत अनेकजणी डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या घेतात. काही जोडपी वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार (1971) 'नको असलेली गर्भधारणां'तर्गत डॉक्‍टरांकडून गर्भपात करून घेतात. मात्र त्यानंतर त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते. हे प्रकार अनेकींसाठी जीवघेणे ठरत आहेत. 

वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नमीता मोकाशी-भालेराव म्हणाल्या, ''गर्भपात गोळ्या घेऊन किंवा सर्जरीद्वारे करता येतो. कोणत्याही पद्धतीचा अवलंब केल्यास सुरक्षित गर्भपातासाठी फॉलोअप गरजेचा आहे. अन्यथा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. भारतात 56 टक्के गर्भपात असुरक्षित असतात. सर्वाधिक गर्भपात 20 ते 29 वयोगटातील मुली-महिला करतात. यामध्ये तीनपैकी एक किशोरवयीन मुलगी असते. यामध्ये लग्न न झालेल्या मुलींचे प्रमाण जास्त असून, धक्कादायक बाब म्हणजे त्या 15 वर्षांआतील असतात. शाळा-कॉलेज पातळीवर याविषयी चर्चा, गप्पा घडवून आणणे गरजेचे आहे.''

बदललेली लाइफस्टाइल किंवा सामाजिक भीतीपोटी चुकीच्या पद्धतीने गर्भपात केला जातो. ही पद्धत त्यांच्या जीवावर बेतू शकते. गर्भपातासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जाणे गरजेचे आहे. त्यांनी विश्‍वासाने डॉक्‍टरांकडे पाहिले पाहिजे. अन्यथा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. 
- डॉ. अर्चना चव्हाण (स्त्रीरोगतज्ज्ञ) 

सन 2017-18 या वर्षात झालेले गर्भपात 

  • पुणे जिल्हा : 16 हजार 96 
  • शहर : 5 हजार 431 
  • पिंपरी-चिंचवड : 1 हजार 825 

स्त्रोत : कुटुंब कल्याण विभाग, आरोग्य खाते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com