बेकायदा वृक्षतोडीबद्दल दोन दिवसांत कारवाई करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

पुणे - उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्याने केलेल्या बेकायदा वृक्षतोडीबद्दल येत्या दोन दिवसांत कारवाई करण्याची सूचना महापौर प्रशांत जगताप यांनी प्रशासनाला सोमवारी सर्वसाधारण सभेत केली. तत्पूर्वी मनसेच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेत कारवाईचा विषय लावून धरला.

पुणे - उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्याने केलेल्या बेकायदा वृक्षतोडीबद्दल येत्या दोन दिवसांत कारवाई करण्याची सूचना महापौर प्रशांत जगताप यांनी प्रशासनाला सोमवारी सर्वसाधारण सभेत केली. तत्पूर्वी मनसेच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेत कारवाईचा विषय लावून धरला.

महापालिकेच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यावर रविवारी गुन्हा दाखल झाला. सर्वसाधारण सभेत मनसेचे गटनेते किशोर शिंदे; तसेच बाबू वागस्कर, बाळा शेडगे, वसंत मोरे, सुशीला नेटके, रूपाली पाटील यांनी बेकायदा वृक्षतोडीचा मुद्दा लावून धरला. कोणतीही परवानगी न घेता महापालिकेचा कर्मचारी वृक्षतोड कशी करू शकतो, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. परवानगी न घेतल्याच्या मुद्‌द्‌याला उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनीही दुजोरा दिला. या वेळी चर्चेदरम्यान भाजपचे गटनेते गणेश बिडकर, धनंजय जाधव आणि मनसेच्या सदस्यांमध्ये चकमक उडाली. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या दबावामुळे धंगेकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, असा आरोप मनसेच्या सदस्यांनी
केला; तर धंगेकर यांनी उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी केला. याप्रकरणी सभागृहात बराच वेळ चर्चा झाल्यावर महापौरांनी आयुक्तांशी चर्चा करून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची सूचना प्रशासनाला केली. दरम्यान, "या प्रकरणात आपण कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. गेले दोन दिवस पुण्याबाहेर असल्यामुळे या प्रकरणाशी संबंध नाही,' असा खुलासा पालकमंत्री बापट यांनी केला आहे.

Web Title: About two days to take action against illegal cutting of trees