Breaking : पुण्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला ९० हजारांचा आकडा!

Corona-Virus
Corona-Virus

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने रविवारी (ता.२) ९० हजारांचा आकडा पार केला आहे. रविवारी रात्री ही संख्या ९० हजार ३९३ झाली आहे. यापैकी आतापर्यंत साठ हजार २७२ रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या शहर आणि जिल्ह्यातील विविध रुग्णालयात २८ हजार २२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आतापर्यंतच्या एकूण रुग्णांमध्ये रविवारी दिवसभरातील तीन हजार १७ नव्या रुग्णांचा समावेश आहे. यापैकी पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ७६२ रुग्ण आहेत. रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये ८७१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २५९, नगरपालिका क्षेत्रात ७७ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डात ४८ नवे रुग्ण सापडले आहेत.

दरम्यान, रविवारी दिवसभरात ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता दोन हजार ८४ झाली आहे. शनिवारी (ता. १) रात्री ९ वाजल्यापासून रविवारी (ता.२) रात्री नऊ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.

आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील १ हजार ३९३, पिंपरी-चिंचवड शहरातील ३८७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १६१, नगरपालिका क्षेत्रातील ६८ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डातील ७५ रुग्ण आहेत.

दरम्यान, रविवारी दिवसभरात ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३२ जण आहेत. याशिवाय रविवारी पिंपरी चिंचवडमधील १०,  जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४ आणि नगरपालिका व कॅंंटोन्मेंट बोर्डातील मिळून ३ जणांचा समावेश आहे.

क्षेत्रनिहाय पूर्ण बरे झालेले रुग्ण

- पुणे शहर - ३८ हजार ११७.

- पिंपरी चिंचवड - १६ हजार १९४.

- जिल्हा परिषद - ३ हजार ८९८.

- कॅंंटोन्मेंट बोर्ड (तीन) - १ हजार ८२.

- नगरपालिका (१४) - ९८१.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com