पिंपरी : पॅरोलवरील फरारी आरोपी पाच वर्षांनी जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

पिंपरी : नाशिक कारागृहातून पॅरोल रजेवर सुटल्यानंतर पुन्हा कारागृहात हजर न होता पाच वर्षांपुर्वी फरारी झालेल्या खुनातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई देहूरोड येथे करण्यात आली. 

मल्हारी काशिनाथ जाधव (वय 58, सध्या रा. अयप्पा मंदीराजवळ, नढेनगर, पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे. 1992 मध्ये झालेल्या खूनप्रकरणी जाधव याच्यावर मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मोठी बातमी -  फडणवीसांच्या गळ्यात देशाच्या अर्थमंत्रीपदाची माळ ? पुढचा अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता..

या गुन्ह्यात तो नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना 2015 मध्ये पॅरोल रजेवर सुटून कारागृहाबाहेर आला होता. मात्र, पॅरोल रजा संपल्यानंतर पुन्हा कारागृहात हजर न होता तो फरारी झाला.

दरम्यान, जाधव हा शुक्रवारी (ता.7) देहूरोड येथे येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी जाधव याला मुलुंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मोठी बातमी - "इथे मराठी माणसाला नोकरी दिली जाणार नाही"

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The absconding accused was arrested five years later