शिक्षा सुनावल्यानंतर फरार झालेल्या गुन्हेगारास पिंपरीत अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

मोहम्मद मन्सूर चंदुलाल इनामदार असे अटक केलेल्याचे नाव आहे. इनामदार विरोधात 2017 आली वानवडी पोलिसांत विनयभंगाच्या गुन्हा दाखल होता. त्यास लष्कर न्यायालतील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. दंड न भरल्यास पंधरा दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. अपिलाची मुदत संपल्यावर तो फरार झाला होता.

पुणे : महिलेचा विनयभंग केला म्हणून न्यायालयाने शिक्षा सुनावण्यावर अपील कालावधी संपल्यानंतर फरार झालेल्या गुन्हेगारास वानवडी पोलिसांनी पिंपरी येथून मंगळवारी अटक केली आहे.

मोहम्मद मन्सूर चंदुलाल इनामदार असे अटक केलेल्याचे नाव आहे. इनामदार विरोधात 2017 आली वानवडी पोलिसांत विनयभंगाच्या गुन्हा दाखल होता. त्यास लष्कर न्यायालतील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. दंड न भरल्यास पंधरा दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली होती.

अपिलाची मुदत संपल्यावर तो फरार झाला होता. त्यामुळे त्याविरोधात अजामीनपात्र अटक वारंट जारी करण्यात आले होते. त्यानुसार पोलिस हवालदार पोपट घुले आणि पोलिस नाईक दादा जाधव यांनी त्यास पिंपरी येथून अटक केली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Absconding criminal arrested in pimpri after After sentencing