Shivajinagar | आर्थिक तरतूद नसल्याने बी. डी. किल्लेदार मिनी मार्केटचे काम थांबले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्थिक तरतूद नसल्याने बी. डी. किल्लेदार मिनी मार्केटचे काम थांबले
आर्थिक तरतूद नसल्याने बी. डी. किल्लेदार मिनी मार्केटचे काम थांबले

आर्थिक तरतूद नसल्याने बी. डी. किल्लेदार मिनी मार्केटचे काम थांबले

sakal_logo
By
समाधान काटे

शिवाजीनगर - जनवाडी येथील अरूण कदम चौकात माजी आमदार बी. डी. किल्लेदार मिनी मार्केट मागील पाच वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. पूर्वी त्या जागेवर असलेल्या व्यवसायिकांना हटवून नवीन इमारत बांधून देण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दिले होते. मात्र, पाच वर्षे उलटूनही अद्याप काम पूर्ण झालेले नाही. इमारत पूर्ण न झाल्याने व्यवसायिक रस्त्यावर हातगाडी लावून व्यवसाय करतात, त्यामुळे कै. अरुण कदम चौकात वाहतूक कोंडी होते. महापालिककडे आर्थिक तरतूद नसल्या कारणाने बांधकाम पुर्ण होण्यासाठी दिरंगाई होत आहे. संबंधित व्यवसायिकांना इमारत कधी पूर्ण होणार याची कोणतीही माहिती प्रशासनाकडून दिली जात नाही. व्यवसायिक गाळे लवकर मिळतील या आशेने वाट बघत आहेत.

'मोटार,पंप दुरूस्ती करण्याचा माझा व्यवसाय होता. तो सध्या इतर ठिकाणी भाड्याच्या जागेत करत आहे. मार्केटचे काम दोन वर्षांत पूर्ण होणं अपेक्षित होतं परंतु अद्याप पूर्ण झालेलं नाही. स्थानिक व्यवसायिकांचा विचार करून प्रशासनाने लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करून गाळे द्यावे'.

- शिवाजी क्षीरसागर, व्यवसायिक

'माझा तिथं चायनीजचा व्यवसाय होता, कोरोनाच्या येण्याच्या अगोदर काम पूर्ण होणे गरजेचे होते, परंतु झाले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष घालत नाहीत. व्यवसायिकांनी एकत्र येऊन बैठक घेतली तर विषय मार्गी लागेल. सदरील काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे'.

- विनोद ओरसे, व्यवसायिक

'कोरोना काळात निधीची उपलब्धता नसल्याने काम बंद आहे, पुढील वर्षी तरतूद उपलब्ध झाल्यास काम पूर्ण करून महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या ताब्यात देऊन गाळे/दूकाने भाडे तत्वावर देऊ शकतात'.

- भाग्यश्री देवकर, महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (भवन विभाग)

बुलेट्स

खाली वाहनतळ वरती तीन मजली इमारत

एकूण ४४ गाळे प्रत्येक मजल्यावर स्री,पुरुष शौचालय

सन २०१३-१४,

पहिली आर्थिक तरतूद ४९,९९२७०/-

खर्च - ४० लाख

ठेकेदार - आर्यन कन्ट्रक्शन

दूसरी आर्थिक तरतूद सन २०१७-१८.

१,९४,१८,५१२

खर्च - ९० लाख

ठेकेदार :- शुभम कन्स्ट्रक्शन

संबंधित बांधकामाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, मार्केटला प्रवेशद्वार (गेट) नसल्याने मद्यांपीचा अड्डा बनला आहे. अस्वच्छाता, वाहनतळच्या जागेवर पाणी साचत असल्याने डासांची उत्पत्ती वाढत आहे. कचरा, राडारोडा मोठ्या प्रमाणात साचला असून दुर्गंधी पसरली आहे.

loading image
go to top