Crime News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; दुसऱ्या तरुणीसोबत साखरपुडा

कात्रज येथील एका हॉटेलमध्ये तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले
Abuse of young woman by luring her marriage engagement with another girl crime police pune
Abuse of young woman by luring her marriage engagement with another girl crime police puneesakal

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने एका तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवत तिच्याकडून एक लाख रुपये घेतले. परंतु तिच्याशी लग्न न करता तरुणाने दुसऱ्याच तरुणीसोबत साखरपुडा करून धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

Abuse of young woman by luring her marriage engagement with another girl crime police pune
Crime News : गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला पोलिस कोठडी

याबाबत वडगाव शेरी येथील एका २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यावरून शुभम पायगुडे (रा. आगळंबे, ता. हवेली) यांच्यासह पाचजणांविरुध्द भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम पायगुडे याने फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले.

Abuse of young woman by luring her marriage engagement with another girl crime police pune
Mumbai Crime : स्वछतागृहाच्या तारा उचकटून त्याने तेथून पळ काढला,कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पाठलाग करत केली अटक

कात्रज येथील एका हॉटेलमध्ये तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. लग्न करण्याच्या बहाण्याने तिच्याकडून एक लाख रुपये घेतले. शुभमच्या भावाने त्या दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत घरी सांगितले. तेव्हा शुभमच्या कुटुंबीयांनी फिर्यादी तरुणीला शिवीगाळ केली. तसेच, त्याचा दुसऱ्या तरुणीसोबत साखरपुडा केला. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी तरुणी गेल्यानंतर तिला धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com