भाजप-शिवसेनेकडून सत्तेचा गैरवापर - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

या गोष्टी माझ्यासाठी नवीन नाहीत...
राष्ट्रवादीचे काही आमदार व नेते भाजप व काँग्रेसमध्ये जात आहेत. याबाबत बोलताना पवार म्हणाले, ‘‘या गोष्टी माझ्यासाठी नवीन नाहीत. १९८० मध्ये आमच्या पक्षातून अनेक जण विरोधी पक्षात गेले. पुढे ते सर्वजण निवडणुकीत पराभूत झाले.’

हडपसर - ‘‘भाजप व शिवसेना सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांतील लोकांना पक्षात प्रवेश देत आहेत. जे लोक प्रवेश करण्यास तयार नाहीत, त्यांना भीती दाखवली जात आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

हडपसर येथे एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी शनिवारी पवार आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, ‘‘कोल्हापूरमध्ये आमच्या एका नेत्याने भाजपमध्ये जाण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यामागे प्राप्तिकरचा ससेमिरा लावण्यात आला. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल.’’ मुलाखतीला आमदार दिलीप सोपल गैरहजर होते. ते भाजप अथवा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. याविषयी पवार म्हणाले, ‘‘ज्यांना तिकिटे मिळण्याची खात्री आहे ते मुलाखतीला आले नाही, तरी पक्ष त्यांना तिकीट देईल. त्यामुळे ते अन्य पक्षात जाणार, ही केवळ अफवा आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abuse of power by BJP and Shivsena Sharad Pawar Politics