esakal | शहरातील पोलिस लाइनच्या जागेत पोलिस वसाहतीचे काम वेगाने सुरु आहे.
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

बारामतीत पोलिस इमारतींच्या कामांना वेग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती : शहरात साकारणाऱ्या पोलिस वसाहत, बारामती शहर पोलिस ठाणे, बारामती वाहतूक शाखा व अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयाचे बांधकाम अत्यंत वेगाने सुरू आहे. येत्या काही महिन्यात या वास्तू तयार होतील, अशी अपेक्षा आहे.

बारामतीच्या वाढत्या विस्तारीकरणासह नागरीकरणाचा विचार करून बारामतीतील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी, या उद्देशाने प्रशासकीय इमारतीसमोर कविवर्य मोरोपंत नाट्यगृहाशेजीरील जागेत शहर पोलिस ठाणे, वाहतूक शाखा व त्याच इमारतीत अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यानुसार आता या इमारतींचे काम वेगाने सुरू आहे.

हेही वाचा: Baramati : भूमापन पध्दतीत ड्रोन सर्वेक्षणामुळे होणार क्रांती

शहर पोलिस ठाण्याची इमारत जुन्या श्रीमंत बाबूजी नाईक वाड्यात अनेक वर्षांपासून आहे. मात्र, वाढता विस्तार विचारात घेता व वाहतुकीवरचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने प्रशासकीय इमारतीसमोरील जागेत नवीन पोलिस ठाण्याची इमारत उभारली जात आहे.

बारामतीतील पोलिस लाईनमधील पोलिस वसाहतीची दुरवस्था झाली होती. प्रत्येक पोलिसाला निवासस्थान चांगले असावे, या उद्देशाने नवीन इमारती उभारण्याचा निर्णय झाला. बारामतीतील बहुसंख्य पोलिस कर्मचाऱ्यांना येथे चांगल्या दर्जाचे घर उपलब्ध होईल. हे काम वेगाने सुरू आहे.

पोलिस लाइन दृष्टिक्षेपात

  1. पोलिस वसाहतीचा खर्च - ५० कोटी रुपये

  2. पोलिस वसाहतीत १९६ सदनिका उभारल्या जाणार

  3. दोन बेडरूमची ५३८ चौरसफुटांची प्रत्येक सदनिका

  4. सात मजली एकूण सात इमारती साकारणार

  5. पोलिस वसाहतीत सर्व अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार

  6. पोलस गृहनिर्माण विभाग इमारती उभारणार

  7. पोलिस ठाणे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक व वाहतूक पोलिस कार्यालयासाठी १४ कोटींचा निधी उपलब्ध.

loading image
go to top