मिळकतकर भरणाऱ्यांच्या पाचशेच्या नोटा स्वीकारा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

पुणे - महापालिकेच्या मिळकतकराचा भरणा करणाऱ्या नागरिकांकडून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात याव्यात, अशी मागणी महापौर प्रशांत जगताप यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे बुधवारी केली.

महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाची सध्या जोरदार मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत रोखीने पैसे भरणाऱ्यांची चलनी नोटांबाबतच्या निर्णयामुळे गैरसोय होणार आहे. त्यामुळे मिळकतकराचा भरणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकाराव्यात, असे आवाहन जगताप यांनी केले आहे. 

आचारसंहिता शिथिल करा 
विधान परिषदेच्या पुण्यातील जागेसाठी 19 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 22 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत आचारसंहिता आहे. प्रत्यक्ष मतदान झाल्यावर आचारसंहितेची गरज राहणार नाही. त्यामुळे त्या दिवसानंतर दुसऱ्या दिवसापासूनच आचारसंहिता शिथिल करून महापालिकेची विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी एका निवेदनाद्वारे राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केले आहे. 

Web Title: accepted five hundred onte- mayor