अरे बापरे ! पुण्यात कोरोना बाधितांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात; 13 जण...

ambulance1.jpg
ambulance1.jpg

बावधन (पुणे) : किष्किंधानगर, जयभवानीनगरमधील कोरोनाबाधित व्यक्तींना घेवून जाणाऱी रूग्णवाहिका पलटी होऊन झालेल्या अपघातात तेरा जण किरकोळ जखमी झाले. मुंबई - बेंगलोर महामार्गावर बावधन येथे सोमवारी (6 जुलै) सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडली.

किष्किंधानगर आणि जयभवानीनगरमधील कोरोनाबाधित रूग्ण घेवून रूग्णवाहिका (क्रमांक एमएच 12 सीटी 9903) मुंबई -बेंगलोर महामार्गावरून बालेवाडीकडे चालली होती. बावधन गावच्या हद्दीत शिवप्रसाद हॉ़टेलसमोर रूग्णवाहिकेच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. समोरून चाललेल्या चारचाकीला धडक देत रूग्णवाहिका महामार्गाच्याकडेलाच पलटी झाली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूकही काहीकाळ ठप्प झाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अपघाताची माहिती मिळताच नगरसेवक किरण दगडे, अमोल बालवडकर, वरीष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. राम सोनवणे घटनास्थळी दाखल झाले. नगरसेवक दगडे यांनी जखमींना घेवून जाणाऱ्या दोघांना त्वरीत पीपीई किट उपलब्ध करून दिले. दुसरी रूग्णवाहिकाही तातडीने बोलविण्यात आली. सर्व जखमींना लवळे येथील दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. सर्व जखमी कोरोनाबाधित व्यक्तींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठिक असल्याचे डॉ.सोनवणे यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com