धनंजय मुंडेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; मुंडे सुखरुप

munde d.jpg
munde d.jpg

पुणे :  विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील एका गाडीचा लोणावळ्याजवळ सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात मुंडे यांना कोणतीही ईजा झालेली नसुन ते सुरक्षित आहेत. तीन गाड्यांची धडक झाल्याने हा छोटासा अपघात झाल्याचे समजते. या अपघातात दोन चालक आणि एक अंगरक्षक जखमी  झाले असून उपचारासाठी त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे.

आज सकाळी धनंजय मुंडे मुंबईला जात असताना हा अपघात झाला. अपघातग्रस्त गाडी मध्ये मुंडे नव्हते तर, त्यापुढे असलेल्या दुसऱ्या गाडीमध्ये ते होते. मुंडे यांना या अपघातात कुठलीही इजा झालेली नसून ते सुरक्षितरित्या मुंबईला पोहोचले आहेत. 

MH -44 T 7 असा अपघातग्रस्त गाडीचा नंबर असून त्यामध्ये असलेले दोन चालक आणि एक अंगरक्षक यांच्या हाता पायाला थोडासा मुका मार लागला. जखमा गंभीर नसून त्यांच्यावर संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.चालक व्यंकट गित्ते, चालक संतोष जाधव, अंगरक्षक  सोपान चाटे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com