पुणे - गंगाधाम चौकामध्ये अलिशान कारचा थरार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

बिबवेवाडी -  बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील गंगाधाम चौकात सिग्नलजवळच भरधाव चारचाकी अलिशान कारने सहा जणांना ठोकरले. यात एक जण गंभीर, तर पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. 

बिबवेवाडी -  बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील गंगाधाम चौकात सिग्नलजवळच भरधाव चारचाकी अलिशान कारने सहा जणांना ठोकरले. यात एक जण गंभीर, तर पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. 

बिबवेवाडीकडून कोंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कमरुद्दीन शेख यांची फॉर्च्युनर कार भरधाव जात होती. या वेळी चालकाला सिग्नलचा अंदाज न आल्याने आईमाता मंदिर रस्त्यावरून मार्केट यार्डकडे जाणाऱ्या वाहनांना ठोकरत या कारने चौकातील टपरीला धडक दिली अन्‌ ती तेथेच थांबली. या चौकामध्ये गाडीने प्रथम मोहित न्याती यांच्या कारला धडक देऊन त्यानंतर दुचाकी चालक आकाश मोरे (रा. हडपसर), फारुक खान व त्यांच्या पत्नी अरबीना खान, प्रतीक पवार, राहुल वाकळे यांना ठोकरले. त्यात आकाश मोरे याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यासह इतर जखमींवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मार्केट यार्ड पोलिसांनी कमरुद्दीन शेख (रा. कोंढवा) याला ताब्यात घेतले आहे. 

उडी मारल्याने बचावलो 
गंगाधाम चौकातील टपरीचालक अंकुश कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांची फॉर्च्युनर कार रात्री वेगाने सिग्नल तोडून तीन दुचाकींसह एका पादचाऱ्याला ठोकरत टपरीवर येऊन आदळली. कार येताना पाहून मी टपरीतून बाहेर उडी मारली. त्यामुळे बचावलो. परंतु, टपरीजवळ उभ्या असलेल्या राहुल वाकळे याला दुखापत झाली. 

Web Title: Accident on Gangawam Chowk at Bibvewadi-Kondhwa road

टॅग्स