
Pune News : वाघोलीत अपघात : ट्रकची दुचाकीला धडक; शिक्षिका ठार
वाघोली – ट्रकची दुचाकीला धडक बसून शिक्षिका जागीच ठार झाल्याची घटना वाघोलीत पुणे नगर महामार्गावर सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. सुप्रिया सजित ढोबळे ( वय 38, रा. कोलवडी, ता हवेली,जि. पुणे ) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शिक्षिकेचे नाव आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया या वाघोली येथील पोद्दार स्कूल मध्ये शिक्षिका होत्या. त्या आपल्या मुलीला शाळेत सोडून स्कुल मध्ये जात होत्या. आय व्ही इस्टेट कडे जाणाऱ्या रोड जवळ महामार्गावर त्यांच्या दुचाकीला ट्रकची धडक बसली.
यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या एक वर्षांपासून पोद्दार स्कुल मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या मृत्यूने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी ट्रक चालकाला लोणीकंद पोलिसानी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
स्पीड ब्रेकरची गरज
वाघोलीत बी जे एस चौक ते वाघेश्वर मंदिर दरम्यान स्पीड ब्रेकरची गरज आहे. या दरम्यान मोठी वाहने सुसाट असतात. ट्रक, डंपर, खाजगी बस, पी एम टी यांचे स्पीड खूपच असते. यापूर्वीही चार ते पाच पादचार्यांचा बळी गेला आहे. यामुळे या भागात स्पीड ब्रेकरची मागणी होत आहे.