Court
Court

उत्पन्नाचा पुरावा नसतानाही एकोणीस लाखांची भरपाई

पुणे - बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी करीत असलेल्या सुपरवायझरचा अपघात झाला. पगार रोख स्वरूपात मिळत असल्याने उत्पन्नाचा ठोस पुरावा त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे अपघातात पाय गमावलेल्या सुपरवायझरला सर्वसामान्य व्यक्ती किती पैसे कमवू शकते, याचा विचार करून त्यांना लोकअदालतीमध्ये १९ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. 

चाकण येथे राहणाऱ्या कृष्णकुमार भागवत (वय ३०) यांनी याबाबत पीएमपीपीएल विरोधात दावा दाखल केला होता. भागवत हे ९ मार्च २०१६ रोजी दुचाकीने खेडवरून चाकणला येते होते. रात्री दहाच्या सुमारास ते स्वयंवर मंगल कार्यालय येथे पोचले असता, पीएमपीच्या बसने त्यांना मागून धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला कायमचे अपंगत्व आले. त्यामुळे ४० लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, असा दावा त्यांनी ॲड. सतीश घरत यांच्यामार्फत मोटार अपघात न्याय न्यायाधिकरणात दाखल केला होता. 

भागवत हे एका बांधकाम व्यावसायिकाकडे सुपरवायझर म्हणून कामाला होते. त्यांना रोख स्वरूपात पगार देण्यात येई. पगाराची नोंद होत नसल्याने त्यांच्याकडे उत्पन्नाचा कोणताही ठोस पुरावा नव्हता. त्यामुळे त्यांना किती नुकसानभरपाई द्यायची, या वादातून तीन वर्षे हा खटला चालला. मात्र सर्वसामान्य व्यक्ती किती पैसे कमावू शकते, या अंदाजानुसार १९ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. पीएमपीच्या वतीने ॲड. जी. पी. शिंदे यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com