जीव वाचविणाऱ्यांची दखलच नाही

पांडुरंग सरोदे
शनिवार, 21 जुलै 2018

पुणे - बाणेर येथे या वर्षी फेब्रुवारीत झालेल्या अपघातात नीलय पाटील गंभीर जखमी झाला होता. त्याची शुद्ध हरपत होती, तेवढ्यात देवेंद्र पाठक या नागरिकाने त्यास रुग्णालयात हलवून त्याचे प्राण वाचविले. अपघातातील जखमींना मदत करण्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात, मात्र देवेंद्र यांच्याप्रमाणे काही जण पुढेही येतात. अशा पुढे येणाऱ्या व्यक्ती, संस्थांना प्रोत्साहन मिळावे, जखमींचे प्राण वाचविण्यासाठी मदतीचे हजारो हात पुढे यावेत म्हणून राज्य सरकारने  मदत करणाऱ्यांना लाखो रुपयांचे बक्षीस देण्याचा अध्यादेश २०१४ मध्ये काढला.

पुणे - बाणेर येथे या वर्षी फेब्रुवारीत झालेल्या अपघातात नीलय पाटील गंभीर जखमी झाला होता. त्याची शुद्ध हरपत होती, तेवढ्यात देवेंद्र पाठक या नागरिकाने त्यास रुग्णालयात हलवून त्याचे प्राण वाचविले. अपघातातील जखमींना मदत करण्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात, मात्र देवेंद्र यांच्याप्रमाणे काही जण पुढेही येतात. अशा पुढे येणाऱ्या व्यक्ती, संस्थांना प्रोत्साहन मिळावे, जखमींचे प्राण वाचविण्यासाठी मदतीचे हजारो हात पुढे यावेत म्हणून राज्य सरकारने  मदत करणाऱ्यांना लाखो रुपयांचे बक्षीस देण्याचा अध्यादेश २०१४ मध्ये काढला. त्यास आता चार वर्षे उलटली, पण मदत करणाऱ्यांचा एकही प्रस्ताव चार वर्षांत पुणे पोलिसांकडून राज्य सरकारकडे गेलेला नाही, हे दुर्दैव ! 

राज्यात अपघातामध्ये दर वर्षी १३ हजार व्यक्‍ती दगावतात, तर ४५ हजार व्यक्‍ती अपंगत्वाचे जिणे जगतात. हे चित्र बदलावे, म्हणून राज्य सरकारच्या गृह विभागाने अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी पुढे येणाऱ्या व्यक्ती, संस्थांना बक्षीस देण्याबाबतचा अध्यादेश काढला. पण, असा काही अध्यादेश आहे, हेच पुणे पोलिसांना माहिती नाही. 

 अपघातातील जखमींना तत्काळ मदत करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना बक्षीस देण्याचा राज्य सरकारचा अध्यादेश आहे. हा अध्यादेश वाहतूक शाखेच्या सर्व विभागांना पाठविण्यात आला आहे. त्यानुसार अपघातामध्ये जखमींना मदत करणाऱ्यांबाबतची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांबाबत राज्य सरकारचा अध्यादेश आहे. त्यानुसार माहिती घेऊन तत्काळ सरकारकडे पाठविली पाहिजे. मी स्वतः एका तरुणाचे प्राण वाचविले, त्याबाबत चतुःशृंगी पोलिस ठाण्याकडे नोंदही आहे. माझ्याप्रमाणे अनेक जण अपघातग्रस्तांना मदत करतात. मात्र, त्यांची दखल घेतली जात नाही.
 - देवेंद्र पाठक, संस्थापक, लाइफ सेव्हिंग फाउंडेशन.

Web Title: accident life saver gift