
Pune Accident: पुण्यात ब्रेक फेल झाल्यानं शिवशाही बसचा विचीत्र अपघात
पुण्यात ब्रेक फेल झाल्यानं शिवशाही बसचा विचीत्र अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी नाही. 25 प्रवासी बचावले. (accident of Shivshahi bus due to brake failure in Pune)
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेक फेल झाल्यानं शिवशाही बस थेट फुटपाथच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. बसचं धडकेत मोठं नुकसान झाल. तर झाडही जमीनीवर कोसळलं. आज सकाळी ही घटना घडली. संगमवाडीच्या बाळासाहेब ठाकरे चौकातली घटना आहे. (Latest Marathi News)
यापूर्वीही राज्यात शिवशाही बस अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. एसटी महामंडळात दाखल झालेली वातानुकूलित शिवशाही बस त्याच्या सुविधांपेक्षा अपघातांमुळेच जास्त चर्चेत असते. शिवशाही बस सेवेत आल्यापासून होत असलेल्या अपघातांचे सत्र थांबलेले नाही. (Marathi Tajya Batmya)

एसटी महामंडळाने जून २०१७ मध्ये शिवशाही या वातानुकूलित बस दाखल केल्या. यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसचा समावेश होता. प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर शिवशाहीला प्रथम अपघातांनी गालबोट लावले.
एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये शिवशाहीचे सुमारे २२१ अपघात झाले. त्याआधीच्या वर्षी ही संख्या २४० होती. अपघात घटले तरी त्याला पूर्णपणे आळा बसला नाही. सध्या एसटीच्या ताफ्यात मालकीच्या ९०० बस आणि भाडेतत्वावरील ४०० बस आहेत.