पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघात; एक ठार, एक जखमी

Accident
Accident

कुरकुंभ (पुणे) - पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ (ता. दौंड) हद्दीत रस्ता ओलांडताना पिकअप जीप व दुचाकी अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार तर तरूण जखमी झाला. अपघात शुक्रवारी (ता. 1) रात्री सातच्या सुमारास घडला.

महामार्गावर कुरकुंभ येथील हॉटेल फौजीसमोरील रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी हा अपघात घडला आहे. रस्ता ओलांडताना भरधाव वेगात जाणाऱ्या मालवाहू पिकअप जीपने (एमएच. 45, टी  2228 ) दुचाकीला (एमएच. 25, एई ,  4424 ) जोरात धडक दिली. अपघतात दुचाकीवरील महिला पुष्पा सोनवणे (वय 65 ) जागीच मृत्यू झाला. तर अमोल सोनवणे (वय 35, दोघे रा. परांडा, जि. उस्मानाबाद) हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी दौंड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अपघातानंतर पिकअप जीप चालक पळून गेला. फौजी हॉटेलसमोरील रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी यापूर्वी अपघात झाले आहेत. पुण्याकडून येणाऱ्या लेनला उतार असल्याने वाहने वेगात येऊन वारंवार अपघात होता. त्यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे परिसरात अपघात होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com