काम उरकवून घरी परतताना मालवाहतूक वाहनाने ८ जणांना चिरडले; चार ठार तर चार जखमी | Alephata Accident News | Pune News | Accident pune traffic police 4 killed and 4 injured farmer Alephata | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident pune traffic police 4 killed and 4 injured farmer alephata

Alephata Accident: काम उरकवून घरी परतताना मालवाहतूक वाहनाने ८ जणांना चिरडले; चार ठार तर चार जखमी

- राजेश कणसे

आळेफाटा : नगर-कल्याण महामार्गावर मालवाहतूक वाहनाने शेतमजूर ८ जणांना चिरडल्याने चार जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पारनेर तालुक्यातील शेतमजुर हे नारायणगाव या ठिकाणी मजुरीसाठी आले होते.

सोमवारी रात्री काम उरकल्यावर हे दोन मोटार सायकलवरून ते आपल्या घरी जात असताना नगर - कल्याण मार्गावरील आळे गावच्या हद्दीत लवणवाडी (ता.जुन्नर) या ठिकाणी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास समोरुन आलेल्या एका भरधाव पीकअप जीपने या आठ जणांना जोरात धडक दिली त्यात ते चिरडले गेले.त्यात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला.

या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातामध्ये सुनंदाबाई रोहित मधे (वय-१८ वर्ष), गौरव रोहित मधे (वय-६ वर्ष), रोहिणी रोहित मधे (वय-१८ महिने), नितीन शिवाजी मधे (वय-२२ वर्ष) सर्व राहणार पळशीवनकुटे ता. पारनेर जि. अहमदनगर असे अपघातात मृत्यू झाले आहेत. तसेच चार जणांना पुढील उपचारासाठी नगर या ठिकाणी उपचारासाठी नेण्यात आले आहे.

हि घटना घडल्या नंतर स्थानिक नागरिकांनी यांची माहिती आळेफाटा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघात इतका भयानक होता की, दुचाकीवरील १८ महिन्याची असलेली मुलगी हि रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात पोलिसांना सापडली आली.

दरम्यान ज्या ठिकाणी हा अपघात झाला आहे ती जागा लवणात असुन दोन्हीही बाजुने उतार असुन या जागेवर वारंवार अपघात झालेले आहेत.तसेच या ठिकाणी शाळा,दुध डेअरी,मंदिर असुन नेहमीच गर्दी असते त्यामुळे या जागेवर गतीरोधक टाकावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :accidentTraffic