चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकचा विचित्र अपघात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

 पुणे : कात्रज - देहुरोड बाह्यवळण मार्गावर वडगाव उड्डाणपुलाच्या दिशेने उताराने वेगात निघालेल्या ट्रकने मोटारीला मागून धडक दिल्यानंतर मार्गावरील स्कुटरसह खड्डयातील मातीत घुसला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात स्कुटरवरील दोघेजण गंभीर तर मोटारीतील चौघे जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  

car
कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वडगाव उड्डाणपूलाच्या दिशेने वेगान निघालेल्या अवजड ट्रकने दत्तनगरचा जिजामाता भूयारी पूल ओलांडला आणि समोरील मोटारीला मागून धडक दिली. धडक जोरदार बसल्यामुळे मोटार पुढील वाहनावर आदळून सात फूट खोल सर्व्हिस रस्त्यावर कोसळली. ट्रक न थांबता त्याच वेगाने पूढे शंभर मीटर गेला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकने मुख्यरस्ता सोडला आणि स्कूटरसह सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला खोलगट भागात जावून रूतला.truck

घटनास्थळी धावलेल्या नागरिकांनी ट्रकखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढून रूग्णालयात पाठवले. ट्रकचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व्हिस रस्त्यावर कोसळलेली मोटार त्या ठिकाणी उभ्या असलेल्या टेंम्पो व मोटारीवर आदळून थांबली. two wheeler

सुर्दैवाने सर्व्हिस रस्त्यावरील वाहतुकीसोबत होणारी दुर्घटना टळली. त्याचवेळी ट्रक मातीत रूतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान बाह्यवळणावर सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली घटनास्थळी आलेल्या स्थानिक व वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 traffic jam

Web Title: Accident of truck accident pune ; Two seriously injured