ट्रकला धडकून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

संदीप घिसे 
मंगळवार, 19 जून 2018

पिंपरी (पुणे) : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई बंगलोर महामार्गावरील पुनावळे येथे मंगळवारी पहाटे घडली.

पिंपरी (पुणे) : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई बंगलोर महामार्गावरील पुनावळे येथे मंगळवारी पहाटे घडली.

अभिषेक मनोज माने (वय 19) आणि अल्ताफ शेख (वय 28, दोघेही रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणांची नावे आहेत. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथे मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर रस्त्याच्या कडेला एक ट्रक थांबला होता. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांना ट्रकचा अंदाज न आल्याने ते ट्रकवर जाऊन धडकले. यामध्ये अभिषेक आणि अल्ताफ हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: accident in truck and two wheeler 2 dies