ट्रक दुभाजकाला धडकून अपघात

संदीप घिसे 
शुक्रवार, 29 जून 2018

पिंपरी (पुणे) : भरधाव वेगातील ट्रक रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात ट्रक ट्रक चालक जखमी झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास वल्लभनगर, पिंपरी येथे घडली. यामुळे पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

राजू भोई (वय 35,  रा. बसवकल्याण, बिदर, कर्नाटक) असे जखमी झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केए-39-4072 हा ट्रक हैदराबादहून माल भरून मुंबईच्या दिशेने चालला होता. पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास एका बेशिस्त कार चालकांमुळे ट्रकवरचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्ता दुभाजकाला जाऊन धडकला. या अपघातात ट्रकच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. जखमी ट्रक चालक राजू  यास वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे. ट्रक अपघातात ट्रकचा डिझेल टँक फुटून रस्त्यावरती डिझेल सांडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. अग्निशामक दलाने हा परिसर पाण्याने धुवून  काढल्यानंतर सकाळी सात वाजताच रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 

दरम्यान अपघातग्रस्त ट्रक रस्त्यावरून बाजूला हटविण्यासाठी आलेल्या क्रेन देखील पलटी झाला. त्यानंतर आणखी एक क्रेन बोलावून अपघातग्रस्त ट्रक बाजूला केल्यावर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

Web Title: accident of truck dash to divider