वारजेत अपघात; वाहनांच्या रांगा चांदणी चौकापर्यंत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

वारजे माळवाडी (पुणे) - पश्चिम बाह्यवळण महामार्गावर  वारजे माळवाडी येथे साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर आज रात्री बस व जीपचा अपघात झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. उड्डाणपुलाचे पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी अपघात झाला आहे. वाहनांच्या रांगा चांदणी चौकापर्यंत पोचल्या आहेत. अपघातात बस व जीपमधील प्रवासी किरकोळ जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

बस व जीप साताऱ्याकडे जात होत्या. साई कृपा ट्रॅव्हलची बस (Mh40 n3611) आणि जीप (mh 12 me 7379) यांच्यात धडक झाली. या रस्त्यावर काम सुरू आहे. तेथील दीड लेनमधून तीन वाहने जाण्याचा प्रयत्न करीत होती, असे अपघात पाहिलेल्या नागरिकांनी सांगितले.

Web Title: Accident in warje Vehicle Range to chandni chowk