बारामतीत ७ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू

pune.jpg
pune.jpg

माळेगाव : बारामती एमआयडीसी पेन्सिल चौकात सुभद्रा माॅलमधील एका कापड दुकानदाराचा ७ वर्षीय मुलगा दुसऱ्या माळ्यावरून खाली पडून मयत झाल्याचे निष्पन्न झाले. पार्थ प्रशांत हिंगाणे (रा. मोनिका लाॅन्स, जळोची-बारामती)  हे मयत मुलाचे नाव आहे. रविवार (ता. ९ रात्री आठ वाजल्याच्या सुमारास वरील घटना घडली.

माॅलच्या इमारातीमध्ये चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी पार्थ खेळत खेळत गेला होता. त्याचा पाय घसरून तोल गेल्याने तो खाली पडला. या अपघातात पार्थच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच मयत झाला, असा प्राथमिक आंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, सुभद्रा माॅल मध्ये प्रशांत हिंगाणे यांच्या मालकीचे श्रीपा फॅशन वर्ल्ड हे कापड दुकान अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. परंतु प्रशांत यांचे दीड वर्षापुर्वीच निधन झाल्याने त्यांच्या पत्नी हे कापड दुकान चालत होत्या. रविवारी सायंकाळच्यावेळी अचानकपणे पार्थ वरील कापड दुकानासमोरून बेपत्ता झाला. त्याच्या नातेवाईकांनी माॅल परिसरात खूप शोधाशोध केली, परंतु तो मिळून आला नाही. सरतेशेवटी पार्थच्या नातेवाईकांनी तालुका पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. प्राप्त स्थितीचे गांर्भीय ओळखून सहाय्यक पोलिस निरिक्षक पोरे यांच्यासह इतर पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांच्या मदतीने तातडीने शोध मोहिम हाती घेतली.

दरम्यानच्या कालावधीत माॅल परिसरातील सीसी टिव्ही फुटेज तपासले असता रात्री साडेआकराच्या सुमारास पार्थ हा माॅलच्या इमारतीच्या दुसऱ्यामाळ्यावरून खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्याला लगेच पुढील उपचारासाठी रुई शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय सूत्रांनी सांगितले. त्या प्रकरणी प्रदीप प्रभाकर हिंगाणे यांनी तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद असून पोलिस हवालदार भानुदास बंडगर पुढील तपास करीत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com