Accident News: मुलीचं पोलीस बनवायचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी आलेल्या वडिलांचा दुर्दैवी अंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

Accident News: मुलीचं पोलीस बनवायचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी आलेल्या वडिलांचा दुर्दैवी अंत

मुलीचं पोलीस बनवायचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी पुण्यात आलेल्या वडिलांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. शिवाजीनगरमध्ये पोलिस भरती प्रक्रिया चालू आहे. या ठिकाणी राज्यातील विविध भागातून या ठिकाणी मुलं मुली येत आहेत. दरम्यान आपल्या मुलीला पोलीस बनवायचं स्वप्न पाहणाऱ्या वडिलांचा पुण्यात अपघात झाला आहे. सुरेश सखाराम गवळी असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

गवळी यांची मुलगी ज्योती ही गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत होती. पोलिस भरती प्रक्रियेची तारीख कळाल्यानंतर सुरेश गवळी हे त्यांच्या पत्नी आणि मुलीसह नाशिकहून पुण्यात आले. काल रात्री पुण्यात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर परिसरात एका फुटपाथवर मुक्काम केला.

पहाटे दोनच्या दरम्यान मुलीला ग्राउंडला सोडल्यानंतर ते शिवाजीनगर परिसरात चहा पिण्यासाठी पायी जात असलेल्या गवळी यांच्यावर समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने उडवलं यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबतचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस असून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अर्जुन नाईकवाडे हे तपास अधिकारी म्हणून काम करत आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहनचा या घटनेचा सी सी टिव्ही फुटेज समोर आलं असून त्या अज्ञात वाहनाचा पोलिस शोध घेत आहेत.

टॅग्स :Pune Newsaccident