अपघातांचे प्रमाण वाढले; PWD कधी लक्ष घालणार?

अनिल सावळे
रविवार, 14 मे 2017

खडीमशीन चौक ते पिसोळी रस्ता धोकादायक 

हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या कडेला डांबरी साईड पट्ट्यांची दुरवस्था झाली आहे. अर्धवट काम आणि रस्त्यावर पसरलेल्या खडीवरून दुचाकीस्वार घसरून पडून अपघात होत आहेत. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

पुणे : शहराच्या दक्षिणेस असलेला उंड्री-पिसोळी हा भाग झपाट्याने विकसित होत आहे. मात्र, त्या तुलनेत नागरिकांना पुरेशा पायाभूत सुविधा नाहीत. खडीमशीन चौक ते पिसोळी या बाह्यवळण रस्त्याचे काम रखडले असून, हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या कडेला डांबरी साईड पट्ट्यांची दुरवस्था झाली आहे. अर्धवट काम आणि रस्त्यावर पसरलेल्या खडीवरून दुचाकीस्वार घसरून पडून अपघात होत आहेत. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. या प्रश्‍नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष कधी देणार, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

खडीमशीन चौक ते पिसोळी या रस्त्याचे कॉक्रिंटीकरणाचे काम गतवर्षी सुरू करण्यात आले. या रस्त्यावर काम करताना ठेकेदाराने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबविलेल्या नाहीत. खडीमशीन चौकापासून टाईनी इंडस्ट्रीयलपर्यंत एकाच बाजूचा रस्ता कॉक्रिंटीकरण झाला आहे. दुसऱ्या बाजूस खडी-मुरूम टाकला आहे. काम सुरू झाल्यापासून सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या बाजूस बॅरिकेड्‌स, रिफ्लेक्‍टर पट्टया बसविण्यात आलेल्या नाहीत. या रस्त्यावर रात्रं-दिवस अवजड वाहतूक सुरू असते.

पथदिवे नसल्यामुळे वाहनचालकांना रात्री अंधारातून मार्ग काढावा लागतो. अर्धवट बांधलेल्या सिमेंट रस्त्यावरून वाहनचालकांना अंदाज न आल्यामुळे खड्यात आदळून अपघात होत आहेत. या रस्त्याच्या कामाचा दर्जाही तपासण्याची गरज आहे. या वर्षभरात घसरून आणि खड्ड्यात आदळून अपघातात 30 जण जखमी झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. 

Web Title: accidents on rise in pune, pwd turns blind eye