वारजे माळवाडी महामार्गावर अपघात; एक ठार, एक गंभीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

पश्‍चिम बाह्यवळण महामार्गावर मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकीचालक जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.

वारजे : पश्‍चिम बाह्यवळण महामार्गावर मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकीचालक जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

अजित बद्रिनाथ धावडे (वय 25) याचा या अपघातात मृत्यू झाला. त्याच्यासोबत दुचाकीवर बसलेला प्रकाश भूमकर (वय 35) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर वारजे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वारजे येथे नव्याने उभारलेल्या उड्डाण पुलावर सातारा बाजूला जाणाऱ्या लेनमध्ये हा अपघात झाला.

तानाजी चित्रपटातील दृष्यावरून वाद उफाळला

दुचाकी उतरत असताना मागून आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. यात वाहनाचे चाकच धावडे याच्या डोक्‍यावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या युवकाचा चेहरा फाटला आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या वेळी वारजे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विवेकानंद वाखारे यांच्यासह सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघातातील जखमी व मृत झालेला तरुण इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे काम करीत असल्याचा अंदाज पोलिस उपनिरिक्षक सोनाली कथले यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidents on Warje Malwadi Highway One killed one injured