कालवा समितीच्या निर्णयानुसार पुण्यात पाणी कपात होणार : महापौर मुक्ता टिळक

mukta tilak
mukta tilak


पुणे : कालवा समितीच्या निर्णयानुसार पुण्यात पाणी कपात होणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले. पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून 26 टीएमसी पाणीसाठा असून, शहराला करण्यात येणाऱ्या पाणीसाठ्यात तूर्तास कोणातीही कपात असा अंदाज व्यक्त केला जात होता. 

यासंदर्भात मुंबईत कालवा समितीची बैठक झाली आहे. ''नव्या निर्णयानुसार १३५० ऐवजी ११५० ‘एमएलडी’ पाणी पुण्याला मिळणार आहे. त्यानुसार वर्षभराचे पाणी पुरवठ्याचे नियोजन करून, आठवडाभरात पाणीपुरवठ्याचे नवे वेळापत्रक जाहीर करूपाणीपुरवठ्यातील कपात उद्यापासून नसेल.'' अशी माहिती महापौर टिळक यांनी कालवा समितीची बैठकीनंतर दिली कालवा समितीची बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जलसंपदाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com