पुणे जिल्ह्यातील सोळा लाख खातेदार अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेस जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई केल्याने, जिल्हा बॅंकेचे सुमारे सोळा लाख खातेदार अडचणीत आले आहेत. सुरवातीच्या काळात त्यांनी बॅंकेत जमा केलेल्या 670 कोटी रुपयांचे काय होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये जुन्या नोटा भरून घेण्यास तसेच बदलून देण्यास रिझर्व्ह बॅंकेने नकार दिला आहे. त्यामुळे या खातेदारांचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. जिल्हा बॅंकांमधील या शाखांकडे सध्या शंभर किंवा इतर नोटाही शिल्लक राहिल्या नसल्याने, त्यांना दैनंदिन व्यवहारही करता येत नाहीत. या संदर्भात मुंबई जिल्हा बॅंकेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकही सहभागी झाली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत न्यायालयात बाजू मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची सुनावणी गुरुवारी होणार आहे.

दरम्यान, बॅंकांमध्ये पैसे मिळत नसल्याने, ग्रामीण भागातील सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. याबाबत केंद्र सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास खातेदारांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: account holder problem in pune district bank