खुनाच्या प्रयत्नानंतर फरारी आरोपीस वर्षानंतर अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

खुनाचा प्रयत्न करून फरारी झालेल्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने एक वर्षाने ताब्यात घेतले. सूरज गायकवाड (रा. लोहियानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पुणे - खुनाचा प्रयत्न करून फरारी झालेल्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने एक वर्षाने ताब्यात घेतले. सूरज गायकवाड (रा. लोहियानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून 2018 मध्ये नाना पेठेमध्ये ओंकार शिवप्रसाद साळुंके (रा. नाना पेठ) याच्यावर सूरज ठोंबरे, कुणाल पिसाळ व सूरज गायकवाड यांनी त्यांच्या 15 ते 20 साथीदारांसह कोयत्याने वार करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेबाबत समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर आरोपी पळून गेले होते. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलिस कर्मचारी अमोल पवार यांना संबंधित घटनेतील एक वर्षापासून फरारी असलेला सूरज गायकवाड हा आरोपी लोहियानगरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचून गायकवाड यास ताब्यात घेतले. 

Web Title: accused arrested after the year

टॅग्स