पोलिस भरती घोटाळ्यातील फरार आरोपीला अटक

Crime
Crime

पुणे - राज्य राखीव पोलिस दलातील (एसआरपीएफ) भरती प्रक्रियेत उत्तरपत्रिकेत फेरफार करून गुण वाढवून घोटाळा केल्याच्या प्रकरणातील एक आरोपी तेजस रामचंद्र नेमाडे (वय 23, रा. सिंहगड रस्ता, पुणे, मूळ रा. अकोला) याला वर्षभरानंतर गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली.

मार्च 2018 ते एप्रिल 2018 या कालावधीत एसआरपीएफच्या बल गट क्रमांक दोनमधील शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामध्ये उत्तरपत्रिका तयार करण्याचे टेंडर एका खासगी कंपनीला दिले होते. त्यातील काही जणांनी उत्तरपत्रिकेत फेरफार करून गुण वाढवले होते. त्याचा फायदा काही उमेदवारांना झाला होता. या प्रकरणी पुण्यात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात यापूर्वी दोघांना अटक झाली आहे. परंतु, मुख्य आरोपी प्रवीण दत्तात्रेय भटकर याच्यासह भूषण निरंजनराव देऊलकर, तेजस नेमाडे हे तिघे एका वर्षापासून फरार होते. भटकरच्या वडिलांचे निधन झाल्याने नेमाडे अमरावती येथे येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार, अमरावती येथे जाऊन नेमाडेला अटक करण्यात आली. नेमाडेला आज लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ओंकार साने यांनी त्यास 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. भटकर आणि देऊलकर या दोघांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे, युनिट पाचचे पोलिस निरीक्षक दत्ता चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com