चतुःशृंगी हद्दीतील आरोपी सांगलीत गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

औंध - चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंडणी व अपहरणाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना सांगली पोलिसांनी तासगावजवळ काल पहाटे अटक केली. एक वर्षापूर्वी बालेवाडी जकात नाक्‍याजवळ गणेश राठोड यांचे अपहरण केल्याप्रकणी नितीन शिंदे, शैलेश शिंदे, नीलेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता; परंतु यातील नितीन शिंदे हा एकटाच पोलिसांच्या ताब्यात आला होता. बाकीचे दोघे वर्षभर फरारी होते. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला हे दोघे तासगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली व त्यानुसार सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी शैलेश शंकर शिंदे (वय 26, रा. शिरगाव, ता.

औंध - चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंडणी व अपहरणाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना सांगली पोलिसांनी तासगावजवळ काल पहाटे अटक केली. एक वर्षापूर्वी बालेवाडी जकात नाक्‍याजवळ गणेश राठोड यांचे अपहरण केल्याप्रकणी नितीन शिंदे, शैलेश शिंदे, नीलेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता; परंतु यातील नितीन शिंदे हा एकटाच पोलिसांच्या ताब्यात आला होता. बाकीचे दोघे वर्षभर फरारी होते. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला हे दोघे तासगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली व त्यानुसार सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी शैलेश शंकर शिंदे (वय 26, रा. शिरगाव, ता. वाळवा, सांगली) व नीलेश रामचंद्र शिंदे (वय 27, ता. वाळवा, सांगली) यांना पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या पथकाने ताब्यात घेतले. या आरोपींना चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आशीर्वाद शिंदे व पोलिस नाईक प्रवीण पाटील यांनी आज सकाळी ताब्यात घेऊन पुण्याला आणले. 

Web Title: accused arrested in sangli