police
police

पुलीस के हाथ लंबे होते है...टेम्पो लुटीच्या प्रकरणात फिर्यादीच निघाला आरोपी 

जुन्नर (पुणे) : कोंबड्यांच्या व्यवहारातील रक्कमेचा अपहार करण्याच्या उद्देशाने फिर्यादीच टेम्पो अडवून मारहाण करून पैसे लुटून नेल्याचे बनाव केला असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी फिर्यादी फरहान लियाकत पठाण (रा. शुक्रवार पेठ, जुन्नर) याच्यासह त्याच्या पुणे येथील तीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. हा बनाव करण्यासाठी त्याने स्वतःच्या ओळखीच्या तरुणांचा वापर केला असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

पठाण याने ४ जुलै रोजी टेम्पोमध्ये कोंबड्या घेऊन जात असताना जुन्नर तालुक्यातील शिरोली गावच्या हद्दीत, वीट भट्टीजवळ दोन मोटारसायकलवरील अनोळखी व्यक्तींनी टेम्पो अडवून पठाण व क्लिनरला मारहाण करून केबिनच्या पेटीतील रोख रक्कम 1 लाख 44 हजार 500 रूपये आणि पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन, असा एकूण 1 लाख 49 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची फिर्याद जुन्नर पोलिस ठाण्यात दिली होती. 

या गुन्ह्याचा तपास करताना फिर्यादीचे मित्र शेख व पठाण यांच्याकडे स्वतंत्र चौकशी केली असता त्यांच्यात बोलण्यात विसंगती जाणवत होती. दरम्यान हा बनाव फिर्यादी पठाण यानेच केला असल्याचे शेख याने पोलिसांना सांगितले. यामुळे दोघांना ताब्यात घेऊन विचारले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अटक केली, तर गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाने पुणे येथून बिलाल मुजाहीद शेख, अजहर जावेद शेख, असिफ कासम शेख (सर्व रा. शिवाजीनगर, पुणे) यांना त्याना ताब्यात घेऊन जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट,    सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, पृथ्वीराज ताटे, पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय जगताप, दिलीप जाधव, पोलिस हवालदार शंकर जम, सुनील जावळे, शरद बांबळे, सचिन गायकवाड, चंद्रकांत जाधव, राजू पुणेकर, मुकुंद आयाचित, विशाल साळुंके, बाळासाहेब खडके, दीपक साबळे, दगडू विरकर, तुषार शिंदे या पथकाने ही कारवाई केली.

Edited By : Nilesh Shende
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com