पोलिस कोठडीत आरोपींचा आत्महत्येचा प्रयत्न

Accused attempted suicide in police custody.jpg
Accused attempted suicide in police custody.jpg

पिंपरी : पोलिसांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात अटकेत असलेल्या दोन आरोपींनी कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला. रवींद्र भागवत सातपुते (वय 27, रा. हनुमाननगर, बारामती) व सुमीत गोवर्धन बेरड (वय 22, रा, कैलास नगर, पुनावळे) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना वाहतूक पोलिसांकडे खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केली.

नेत्रविकारावर पुण्याच्या डॉक्‍टरने दिली नवी दृष्टी  

न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावल्याने दोघांनाही पिंपरी पोलिस ठाण्यात ठेवले होते. रविवारी (ता. 24) दुपारी पावणेचारच्या सुमारास दोघांनी जीन्स पॅन्टला असलेल्या धातूच्या लोगोने हाताची नस कापून घेतली. त्यांना उपचारार्थ वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.  
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com