गज वाकवून आरोपीचे पलायन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

पुणे - खुनाच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीने खडकी पोलिस ठाण्यातील कोठडीतील खिडकीचे गज वाकवून रविवारी (ता.9) पहाटे दोनच्या सुमारास पलायन केले. सिराज अमीर कुरेशी (वय 40, रा. सुरती मोहल्ला, खडकी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याबरोबर चौकशीसाठी आणलेला सनी विजय अँडी (वय 25, रा. आनंद पार्क, विश्रांतवाडी) हा देखील या वेळी पळून गेला आहे. 

याप्रकरणी सहायक पोलिस फौजदार बाजीराव चिमण ठोंबरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीच्या तपासासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. दोघेही संगनमत करून पळाल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलाबाचा त्रास असल्याचा बहाणा करून कुरेशी याने कोठडीच्या बाहेरील पॅसेजमध्ये बसविण्याची विनंती पोलिसांना केली. त्यानुसार पोलिसांनी त्याला पॅसेजमध्ये बसविले. अँडी याला याच गुन्ह्यासंबंधी चौकशीसाठी आणले होते. त्याला याच ठिकाणी बसविले होते. दरम्यान, गार्ड पोलिस काही वेळ आराम करण्यासाठी गेले. त्यानंतर पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता कोठडीची पाहणी केली त्या वेळी त्यांना कुरेशी आणि अँडी पॅसेजमधील खिडकीचे गज वाकवून पळून गेल्याचे आढळले. 

पूर्ववैमनस्यातून योगिराज खंडाळे या तरुणाचा 12 जणांनी तलवार आणि चॉपरने वार करून खून केल्याची घटना 31 मार्च रोजी खडकी बाजार येथे घडली होती. या गुन्ह्यात कुरेशी याच्यासह सात आरोपी पोलिस कोठडीत होते. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. 10) पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिसांच्या ताब्यातून संशयित पळाल्याची मागील तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. 

Web Title: accused fled

टॅग्स