esakal | 'त्या' बहाद्दराने तेलंगणामध्ये केला प्रेयसीचा खून अन्... 
sakal

बोलून बातमी शोधा

pol.jpg

 तेलंगणा येथील प्रेयसीने लग्नाला नकार दिल्यामुळे तिचा खून करुन फरारी झालेल्या आरोपीस खडक पोलिसांनी अटक केली.

'त्या' बहाद्दराने तेलंगणामध्ये केला प्रेयसीचा खून अन्... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : तेलंगणा येथील प्रेयसीने लग्नाला नकार दिल्यामुळे तिचा खून करुन फरारी झालेल्या आरोपीस खडक पोलिसांनी अटक केली. खुनाची घटना जानेवारी महिन्यात घडली होती.

हेही वाचा : सुशांतची एक्स गर्लफ्रेंडवर गंभीर आरोप, अंकितानं दिलं 'असं' सडेतोड प्रतिउत्तर

अफजल अमीर पाशा (वय 27, रा. धर्माबाद जि. नांदेड) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पाशा याचे तेलंगणा राज्यातील बसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीसमवेत प्रेमसंबंध होते. त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. मात्र तरुणीने त्याच्यासमवेत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने 22 जानेवारी 2020 रोजी तिचा गळा दाबून खून केला. या घटनेनंतर पाशा तेथून फरारी झाला होता. 

दरम्यान, शनिवारी सकाळी साडेदहा वाजता तेलंगणा पोलिसांचे पथक खडक पोलिस ठाण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन तेलंगाणा पोलिसांच्या पथकाला मदतीला खडक पोलिस दिले. त्यानंतर खडक पोलिसांनी त्यांच्याकडून संशयित आरोपीची सविस्तर माहिती घेऊन त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली.

महत्त्वाची बातमी : मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन कधी होणार सुरू? बड्या मंत्र्यानं दिलं 'हे' उत्तर

दरम्यान, तांत्रिक मदतीने संशयित आरोपी खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यास तत्काळ अटक करुन तेलंगाणा पोलिसांच्या ताब्यात दिले. खडक पोलिसांनी तत्काळ मदतीचा हात देत तांत्रिक कौशल्याच्या आधारे आरोपीस पकडून दिल्याबद्दल तेलंगण पोलिसांनी पुणे पोलिसांबद्दल आभार व्यक्त केले. सहायक पोलिस निरीक्षक सुशिल बोबडे, उमाजी राठोड, पोलिस कर्मचारी अजिज बेग, विनोद जाधव, राकेश क्षिरसागर, समीर माळवदकर, संदीप कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोठी बातमी : जुन्या कपड्यांनी उलगडला कोट्यधींचा कर गैरव्यवहार; बोगस कोडवरून चढ्या भावाने निर्यात

(Edited by : Sagar Diliprao Shelar) 

loading image