शिरवळमधील पत्रकारावर खुनी हल्ला करणाऱ्या आरोपीस दिड वर्षा नंतर अटक 

Accused of murderous attack on journalist in Shirwal arrested after a year and a half.jpg
Accused of murderous attack on journalist in Shirwal arrested after a year and a half.jpg

पुणे : शिरवळ येथील एका पत्रकारावर सत्तुर व चाकूने वार करून तब्बल दिड वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रविवारी मध्यरात्री कात्रज परिसरात ही कारवाई करण्यात आली. 

शफीक रफीक शेख असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर मुराद पटेल असे हल्ला झालेल्या पत्रकाराचे नाव आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

11 एप्रिल 2019 या दिवशी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील शिरवळ पटेल हे त्यांच्या गाडीतून जात होते. त्यावेळी शिवाजी चौक ते सटवाई चौकादरम्यानच्या रस्त्यावर शफीक शेख व त्याच्या साथीदारांनी पटेल यांना अडवून त्यांच्यावर सत्तुर व चाकूने वार केले होते. या हल्ल्यात पटेल गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर शेख व त्याचे साथीदार पळून गेले होते. याप्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार

दरम्यान, सातारा पोलिसांनी शेख याच्या साथीदारांना तत्काळ अटक केली, मात्र शेख हा दिड वर्षांपासून गुंगारा देत होता. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे हे त्यांच्या पथकासह कात्रज पोलिस चौकीच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री गस्त घालत होते. त्यावेळी शिरवळच्या पत्रकारावर खुनी हल्ला करणारा शफीक पटेल हा रविवारी रात्री कात्रज बाह्यवळण येथे त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी येणार असल्याची खबर शिंदे यांना मिळाली.त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे यांच्या पथकाने कात्रज बाह्यवळण महामार्गावर सापळा रचून अटक केली, त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com