पोलिसांच्या कोठडीतील आरोपीचा दवाखान्यात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

धायरी : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्ता पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कारवाई सुरु आहे. अवैध गावठी  दारू विक्री प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ६० वर्षीय आरोपींचा मृत्यू झाला आहे. फिट आल्यानंतर त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यावेळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयडीचे पथक दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. सोपान मधूकर देवकर (६०, आंबेगाव खुर्द) असं मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या नऱ्हे चौकीतील पथकाने सोपान देवकर याला जेएसपीएम  कॉलेज मागील मोकळ्या प्लॉट मध्ये १० एप्रिलला रात्री अवैध दारू विक्री प्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच ११ एप्रिलला त्याला पोलिसांच्या कोठडीत असतानाच फिटचा झटका आला. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्यासंदर्भातील अहवाल न्यायालयात सादर करून त्याची वैद्यकीय कोठडी घेतली होती. तीन ते चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते.

दरम्यान रविवारी रात्री ससून रुग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली. गेल्या चार महिन्यात सिंहगड पोलीस हद्दीत खून ,जबरी हाणामाऱ्या, दरोडे,चोऱ्या आदी गुन्ह्यांचे सत्रच सुरू आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न  चव्हाट्यावर आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: The accused in the police custody died in the hospital