पोलिसांना दोन वर्षे देत होता चकवा...अखेर असा अडकला जाळ्यात 

मनोज कुंभार
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

खंडणी न दिल्याने ठेकेदाराला बेदम मारहाण करणाऱ्या वेल्हे येथील फरारी आरोपीस तब्बल दोन वर्षानंतर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकतेच जेरबंद केले आहे.

वेल्हे (पुणे) : खंडणी न दिल्याने ठेकेदाराला बेदम मारहाण करणाऱ्या वेल्हे येथील फरारी आरोपीस तब्बल दोन वर्षानंतर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकतेच जेरबंद केले आहे. वेल्हे पोलिसांनी काल (ता. ३१ जुलै) त्यास अटक करून न्यायालयात हजर केले.

निवृत्तीनंतर झेडपी शाळांचे आधरवड बनले सातकर गुरुजी

मंगेश उर्फ बाळासाहेब विठ्ठल भोरेकर (वय ३६) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुंजवणी धरणावर वीज निर्मिती केंद्राचे काम करणारे नीलेश पवार (वय 36, रा. वेल्हे) यांनी खंडणी न दिल्याने त्यांना व सुमीत धुमाळ यांना भोरेकर व त्याच्या साथीदारांनी लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात भोरेकर व त्याच्या साथीदारांना विरुद्ध दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून बाळासाहेब भोरेकर हा फरारी होता. तो नांदेड फाट्यावर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे सापळा लावून त्याला जेरबंद केले.

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या देखरेखेखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, दत्ता जगताप, राजेंद्र चदनशिव, विजय कांचन, अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, धीरज जाधव, अक्षय नवले यांच्या पथकाने ही कारवाई केली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused in Velhe ransom case arrested after two years