
खुनी हल्ला व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्ह्यातील फरारी सराईत गुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलिसांनी सोमवारी रात्री कात्रज गावातून ताब्यात घेतले.
बिबवेवाडी (पुणे) : खुनी हल्ला व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्ह्यातील फरारी सराईत गुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलिसांनी सोमवारी रात्री कात्रज गावातून ताब्यात घेतले.
सुनील रामचंद्र भरगंडे (वय 47) रा. संतोष नगर, कात्रज यांना फेब्रुवारी महिन्यात आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या गुन्ह्यातील फरारी आरोपी निलेश दत्तात्रेय सातपुते (वय 28) रा. राजहंस कॉलनी, कोथरूड हा कात्रज गावातील शंकर मंदिराजवळ आलेला असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विक्रम सावंत यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुन्हे पोलिस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जी.डी. घावटे, सोमनाथ सुतार, संतोष भापकर, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजित जाधव, राहुल तांबे, गणेश शेंडे, विक्रम सावंत यांच्या पथकाने कारवाई केली.
संपादन - सुस्मिता वडतिले