आचार्य अत्रे प्रतिष्ठान दरवर्षी देणार  "अनिल कांबळे काव्य पुरस्कार' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

ज्येष्ठ कवी, गझलकार अनिल कांबळे त्यांच्या नावाने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड आणि आचार्य अत्रे प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी "अनिल कांबळे काव्य पुरस्कार" देणार असल्याचे अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी जाहीर केले. 

सासवड (पुणे)  : "त्या कोवळ्या फुलांचा बाजार पहिला मी..' यासह सुमारे सहाशेहून अधिक गझल व गीते लिहिणारे ज्येष्ठ कवी, गझलकार अनिल कांबळे त्यांच्या नावाने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड आणि आचार्य अत्रे प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी "अनिल कांबळे काव्य पुरस्कार" देणार असल्याचे अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी जाहीर केले. 

सासवडचे सुपुत्र कवी अनिल कांबळे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित येथील शोकसभेत कोलते बोलत होते. साहित्य परिषदेचे अध्यक्ष ऍड. प्रकाश खाडे, माजी नगराध्यक्ष ऍड. कला फडतरे, प्रमुख अतिथी म्हणून या वेळी उपस्थित होते. 

कांबळे यांचा 1 ऑगस्ट हा स्मृतिदिन म्हणून दरवर्षी नामदेव शिंपी समाज मंडळ व सासवडकर साहित्यप्रेमींकडून कविसंमेलन स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. अनिल कांबळे यांच्यामुळे सासवडला विविध कविसंमेलने, साहित्यिक उपक्रम झाल्याच्या आठवणी अनेकांनी सांगितल्या. 

ऍड. दिलीप निरगुडे, हेमंत ताकवले, शलाका गोळे, वसंत ताकवले, कुंडलिक मेमाणे, श्रीकांत कांबळे, गोविंद बोत्रे, उल्हास आढाव, ऍड. महेश बारटक्के, दशरथ यादव, बंडूकाका जगताप, महेश जगताप आदींनी या वेळी अनिल यांच्या स्मृतींना अभिवादन केले. 

"त्या कोवळ्या फुलांचा बाजार पहिला मी,' "तुला जर द्यायचे आहे तर ते प्रहर दे माझे,' "रिमझिमणारा श्रावण मी..' आदी रचनाही या वेळी सादर झाल्या. डॉ. राजेश दळवी, मोहन चव्हाण, माउली गिरमे, रामदास जगताप, बाळासाहेब कुलकर्णी, किरण हेंद्रे, चारुशीला कांबळे आदी उपस्थित होते. डॉ. जगदीश शेवते यांनी सूत्रसंचालन केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Acharya Atre Foundation "Anil Kamble Poetry Award"