esakal | बारामतीतील कोरोना रुग्णांसाठी या रुग्णालयांमध्ये सुविधा
sakal

बोलून बातमी शोधा

Hospital

बारामती शहरातील 41 खासगी रुग्णालयांतील 514 बेड अधिग्रहीत करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी काढला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना आता आवश्यकता भासल्यास या रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.

बारामतीतील कोरोना रुग्णांसाठी या रुग्णालयांमध्ये सुविधा

sakal_logo
By
मिलिंद संगई

 
बारामती (पुणे) : बारामती शहरातील 41 खासगी रुग्णालयांतील 514 बेड अधिग्रहीत करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी काढला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना आता आवश्यकता भासल्यास या रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. यामध्ये ऑक्सिजनची सुविधा असलेल्या 227 बेडचा व व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या 33 बेडचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अधिग्रहीत केलेल्या रुग्णालयांतील उपलब्ध बेडची संख्या पुढीलप्रमाणे : भंडारे हॉस्पिटल- 10, बोबडे हॉस्पिटल- 9, जगन्नाथ हॉस्पिटल- 22, शांताबाई देशपांडे मेमोरेयील हॉस्पिटल- 25, लाईफलाईन हॉस्पिटल- 15, देशमुख मॅटर्निटी हॉस्पिटल- 9, वात्सल्य हॉस्पिटल- 5, नंदादीप हॉस्पिटल- 8, गावडे हॉस्पिटल- 18, अनुचंद्र हॉस्पिटल- 25, श्री चैतन्य हॉस्पिटल- 15, बारामती हॉस्पिटल-35, सुशीला अँक्सिडेंट हॉस्पिटल- 15, श्री हॉस्पिटल- 12, संचित हॉस्पिटल- 15, धुळाबापू कोकरे मेमोरिअल हॉस्पिटल- 8, लोंढे हॉस्पिटल- 7, श्रेयस हॉस्पिटल- 7, मेहता हॉस्पिटल- 10, श्रीपाल हॉस्पिटल- 22, माऊली हॉस्पिटल- 10, ओंकार हॉस्पिटल- 8, निंबाळकर हॉस्पिटल- 4, हितेश हॉस्पिटल- 5, भाग्यजय हॉस्पिटल- 22, वाघमोडे मॅटर्निटी अँड चिल्ड्रेन हॉस्पिटल- 6, आटोळे हॉस्पिटल- 8, अमृत हॉस्पिटल- 5, शिवनंदन पॉलीक्लिनीक- 25, देवकाते हॉस्पिटल- 20, यशोदीप अँक्सिडेंट हॉस्पिटल- 7, गिरीराज हॉस्पिटल- 32, रमामाधव हॉस्पिटल- 7, यश नर्सिंग हॉस्पिटल- 15, जिवराज हॉस्पिटल- 10, वात्सल्य सर्जिकल हॉस्पिटल- 6, अंकुर नर्सिंग हॉस्पिटल- 5, अवधूत हॉस्पिटल- 7, मेडीस्कीन हॉस्पिटल- 6, पवार हॉस्पिटल- 7, आरोग्य हॉस्पिटल- 7. 

देशाचा जलखजिना आता एकाच क्लिक वर

पुढील आदेश होईपर्यंत वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय यांनी सदरची रुग्णालये आवश्यकतेनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरावीत,  बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांना या संदर्भात कारवाईची गरज भासल्यास प्राधिकृत करण्याचेही आदेशात नमूद आहे.