सायबर गुन्ह्यांतील चार कोटी हस्तगत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

पुणे - डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झालेल्या लोकांची तब्बल ३ कोटी ९३ लाख २२ हजार रुपयांची रक्कम सायबर गुन्हे शाखेने परत मिळवून संबंधितांकडे सुपूर्त केली. मागील नऊ महिन्यांमध्ये सायबर गुन्हे शाखेकडे दाखल झालेल्या १७३३ पैकी २३६ अर्जदारांची रक्कम परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाले. 

सायबर गुन्हे शाखेकडे डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे आर्थिक फसवणूक झाल्याचे गुन्हे रोज नोंद होतात. ओटीपी इतरांना सांगितला नसतानाही आर्थिक फसवणूक झालेल्या शाजिब मुजुमदार व सुजाता पाटील यांची अनुक्रमे ५२ हजार ७५६ व २४ हजार ९३८ रुपयांची फसवणूक झाली होती. त्यांनी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला होता. सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे, पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, रूपाली पवार, राजेश पिंपरीकर, माधुरी डोक यांच्या पथकाने संबंधित कंपन्यांशी पत्रव्यवहार करून  फसवणूक झालेली रक्कम परत  मिळविली.

१ जानेवारी ते २० सप्टेंबर २०१८ या कालावधीत सायबर गुन्हे शाखेकडे या स्वरूपाचे फसवणूक झालेल्या १७३३ जणांनी तक्रार अर्ज दाखल केले. त्यापैकी २३६ अर्जांची रक्कम परत मिळविण्यासाठी सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने प्रयत्न केले. त्यानुसार ३ कोटी ९३ लाख २२ हजारांची रक्कम परत मिळविण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती सिंह यांनी दिली.

Web Title: Acquisition of four crores of cyber crimes