रस्त्यावरच रंगल्या चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

पुणे - कोथरूडमधील प्रभाग १२ मध्ये भाजप आणि शिवसेना यांचे उमेदवार ठरविण्यावरून उशिरापर्यंत नाट्य रंगले होते. त्यामुळे त्यांचे उमेदवार शेवटच्या तासाभरात अर्ज दाखल करण्यासाठी कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाले. या प्रभागात ३५ अर्ज, प्रभाग दहामध्ये ३७ आणि प्रभाग ११ मध्ये २१ अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करण्यासाठी वेग लागत असल्याने रस्त्यावर थांबलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चांगल्या चर्चा रंगल्या होत्या.

कार्यालयाच्या परिसरात सकाळपासूनच गर्दी झाली होती. पोलिसांनी कार्यालयापासून काही अंतरावरच कार्यकर्त्यांना थांबविले. उमेदवार आणि त्यांच्या सूचक, अनुमोदक यांनाच आत सोडत होते. शिवसेनेचे नगरसेवक योगेश मोकाटे यांना प्रभाग १२ मध्ये उमेदवारी न देता माजी नगरसेवक श्‍याम देशपांडे यांना देण्यात आली.

मोकाटे हे भाजपकडून निवडणूक लढविणार का, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, ते निवडणुकीच्या रिंगणापासून दूर राहिले. भाजपने त्यांचे जुने कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी यांच्या पत्नी ज्योत्स्ना यांच्याऐवजी शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले नवनाथ जाधव यांच्या पत्नी वासंती यांना उमेदवारी दिल्याने कुलकर्णी यांनी भाजप कार्यालयासमोरच धरणे आंदोलन सुरू केले. प्रभाग अकरामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक मानकर आणि नगरसेविका अश्‍विनी जाधव यांनी अर्ज दाखल केले.

या तिन्ही प्रभागांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. प्रभाग दहातील सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या असून, अन्य दोन्ही प्रभागांतील प्रत्येकी दोन जागा या पक्षांना मिळाल्या आहेत. त्यामुळे ही आघाडी या भागात भाजप व शिवसेनेला चांगली लढत देईल, असे कार्यकर्ते सांगत होते.

Web Title: Across the road politics discussion