अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १०६ रिक्षांवर कारवाई 

pune.jpg
pune.jpg

हडपसर :  हडपसर पोलिस ठाण्याच्यावतीने नियमांची पायमल्ली करणा-या बेशिस्त अवैध प्रवासी वाहतूक करणा-या १०६ रिक्षांवर कारवाई करून जप्त करण्यात आल्या. सोमवारी सायंकाळी साडेचार ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली. एकाच वेळी एवढया मोठया प्रमाणात कारवाई झाल्याने रिक्षा चालकांचे धाबे दणाणले. हि कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल तांबे यांनी दिली. 

जप्त करण्यात आलेल्या रिक्षांमध्ये स्क्रॅप झालेल्या रिक्षा, गणवेश परिधान न करणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, चालकाच्या आसना शेजारी प्रवासी बसविणे, रिक्षा थांबा नसताना रिक्षा थांबविणे, चालकाकडे बॅच व लायसन्स नसणे, अल्पवयीन रिक्षाचालक, अवैध थांब्यावर रिक्षा थांबवणे, रिक्षाला परमिट नसणे, रसत्यावर बेशिस्तीने रिक्षा थांबवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहतूक करणे, अशा रिक्षांचा समावेश आहे. हि कारवाई हडपसर ते गाडीतळ या दरम्यान करण्यात आली. यापुढे हडपसर परिसरातील सर्व भागातील रस्त्यावर धावणाऱ्या अवैधरिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालक तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना चपराक बसली आहे. यासाठी वाहतूक अशाप्रकारे  आढळून आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com